About Us

‘मराठीमेवा डॉट कॉम’ हे व्यासपीठ फक्त माहिती देण्यासाठी आहेत. यात वर्तमान, भविष्य आणि भूतकाळातील महत्वाच्या गोष्टीची माहिती, घडामोडी, शोध, दर्शन, दस्तऐवज आणि इतर उपलब्ध संदर्भावरून मिळवलेली माहिती संकलित करून ‘मराठी मेवा’ या सदरावर उपलब्ध करीत आहोत.

मराठीमेवा डॉट कॉम हे केवळ एक वेबसाइट नाही, तर ही एक चळवळ आहे – आपल्या मातृभाषेचा, आपल्या मातीचा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान जपणारी!

आम्ही येथे मराठी भाषेतील संस्कृती, इतिहास, साहित्य, कवी-लेखक, थोर व्यक्ती, भूगोल, लोककला, सण-उत्सव, आणि समाजातील ‘अदृश्य पण अनमोल’ गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.

आमचं उद्दिष्ट स्पष्ट आहे – “मराठी माणसाला त्याच्या मूळाशी, त्याच्या शौर्याशी, आणि त्याच्या संस्कृतीशी पुन्हा एकदा जोडून देणं!”

आमची वैशिष्ट्ये:

  1. स्थानिक गोष्टींना जागतिक ओळख देण्याचा प्रयत्न
  2. दुर्लक्षित, विस्मरणात गेलेल्या गोष्टींचा शोध
  3. संक्षिप्त, प्रभावी व माहितीपूर्ण लेखन
  4. कोणताही राजकीय किंवा धार्मिक पूर्वग्रह न ठेवता ‘माणूस’ या मूल्याभोवती केंद्रित विचार

सदर माहिती फक्त महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांपुरती मर्यादित असून इतर कोणत्याही व्यक्ती, समाज आणि समूह यांसाठी नाही. महाराष्ट्र आणि मराठी माणसाविषयी थोडक्यात –

कोणासाठी? कश्यासाठी? थोडक्यात-

महाराष्ट्र पश्चिमेस समुद्र, वायव्येस गुजरात राज्य, उत्तरेस मध्येप्रदेश व पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस आंद्रप्रदेश आणि दक्षिणेस गोवा आणि कर्नाटक राज्ये आहेत. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१४ चौरस किलोमीटर आहे, महाराष्ट्रास लाभलेल्या समुद्र किनाऱ्याची लांबी ७२० किलोमीटर आहे. महाराष्ट्रची पूर्व-पश्चिम लांबी ८०० किलोमीटर आहे तर महाराष्ट्रची उत्तर-दक्षिण लांबी – ७०० किलोमीटर.

महाराष्ट्राची शासकीय भाषा ‘मराठी’ आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उप राजधानी नागपूर आहे. तसेच मुंबई हि भारताची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्रातील एकूण जिल्हे ३६ आहेत तर एकूण तालुके ३५८ आहेत. महाराष्ट्रातील एकूण  ग्रामपंचायती २७,९०६ आहेत. महाराष्ट्रातील एकूण २६ महानगरपालिका आहेत.

राज्यातील सर्वात मोठे आकारमान असणारा जिल्हा अहमदनगर आहे तर सर्वात कमी जंगल क्षेत्र असलेला जिल्हा बीड आहे. राज्यतील सर्वात लांब नदी गोदावरी आहे. राज्यातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आणि राज्यात सर्वात जास्त पाऊस सिंधुदुर्ग जिल्हा होतो. क्षेत्रफळाचा बाबतीत राजस्थान, मध्यप्रदेश नंतर महाराट्राचा तिसरा क्रमांक लागतो.

मराठीमेवा डॉट कॉम – आपल्या मातीचं, आपल्या माणसांचं, आपल्या अभिमानाचं व्यासपीठ!

एक खटाटोप-

महाराष्ट्र हा फळे, साखर, कापड उद्योग, गड-किल्ले, कोकण, खान्देश, विदर्भ, मराठवाडा, दक्खण, चित्रपट सृष्टी, कला, भूषण, पर्यटन आणि देवस्थान यांच्या विविधतेने परिपूर्ण असा समृद्ध आहे. अश्या ‘या’ महाराष्ट्रात जन्मलेल्या, राहत असलेल्या, काम करत असेलल्या आणि ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती या मातीसाठी दिली, या मराठी माणसांसाठी दिली आणि अमर झाले. अश्या प्रत्येक मराठी माणसासाठी हा खटाटोप.