तुम्ही देखील आरोग्य विमा काढला आहे का? तर ही बातमी नक्की वाचा…

कोरोना कालावधीपासून जर आपण पाहिले तर आरोग्य विमा काढणाऱ्यांच्या संख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे आपल्याला दिसून आले आहे. तसे पाहायला गेले तर आरोग्याची समस्या ही कधी कुणाला विचारून येईल हे अजिबात सांगता येत नाही. त्यामुळे भविष्यकालीन आर्थिक स्थितीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर आरोग्य विमा हा आपल्याला आर्थिक अडचणीच्या वेळेस खूप मदतीला येऊ शकतो.

त्यामुळे महत्त्वाच्या असलेल्या या आरोग्य विम्याच्या बाबतीत जे काही नियम आहेत त्यामध्ये आता केंद्रातील मोदी सरकारने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यामुळे जर तुम्ही आरोग्य विमा काढला असेल तर हे नियमात करण्यात आलेले बदल तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचे आहे.

आरोग्य विम्याच्या नियमात करण्यात आले बदल

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोदी सरकारने आरोग्य विम्याच्या नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलानुसार जर पाहिले तर आता आरोग्य विमाधारकांनी रुग्णालयामध्ये जर उपचार घेतले असतील तर त्यांना आता कॅशलेसची सुविधा मिळणार आहे.

यामध्ये आपल्याला माहित आहे की बऱ्याचदा विमा कंपन्यांनी काही रुग्णालयांशी अगोदरच टाय अप केलेले असते. त्यामुळे आपल्याला जर काही उपचार घ्यायचे असतील तर त्या कंपन्यांच्या नेटवर्कमधील हॉस्पिटलमध्येच आपल्याला उपचार घेणे गरजेचे होते व त्या ठिकाणीच आपल्याला कॅशलेसची सुविधा मिळत होती.

परंतु आता बदलण्यात आलेल्या या नियमानुसार पाहिले तर अशा कंपन्यांच्या नेटवर्कच्या बाहेरील हॉस्पिटलमध्ये देखील तुम्ही आता उपचार करू शकणार आहात. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आता कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी हा बदल करण्यात आलेले असून याकरिता जनरल इन्शुरन्स कौन्सिलने आरोग्य विमा पॉलिसीधारकांसाठी कॅशलेस एवरी व्हेअर  उपक्रम सुरू केला आहे.

त्यामुळे आता विमाधारकाला प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचाराची सोय होणार आहे. 15 खाटा असलेली आणि क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट कायद्याच्या अंतर्गत संबंधित राज्यांच्या आरोग्य प्राधिकरणांकडे जे हॉस्पिटल नोंदणीकृत आहेत ते आता हे कॅशलेस हॉस्पिटललायझेशनची सुविधा देऊ शकणार आहेत.

 याकरिता तुम्हाला या गोष्टींचे पालन करावे लागेल

  1. यासाठी संबंधित विमाधारकाने हॉस्पिटलमध्ये प्रवेश करण्याआधी कमीत कमी 48 तास अगोदर विमा कंपनीला त्या बाबतीत कळवलेले असावे.
  2. इमर्जन्सी उपचार असतील तर ग्राहकाने म्हणजेच विमाधारकाने प्रवेशाच्या 48 तासांच्या आत विमा कंपनीला कळवावे.
  3. विम्याच्या ज्या काही अटी आहेत त्यानुसार तुमचा दावा हा स्वीकार्य असणे गरजेचे आहे.
  4. विमा कंपनीचे जे काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्यानुसारच कॅशलेस सुविधा स्वीकार्य असावी.

सध्याची व्यवस्था कशा पद्धतीची आहे?

अगोदरच्या पॉलिशी धारकांनी आरोग्य विमा घेतलेला आहे त्यांना ही सुविधा तेव्हाच देण्यात येत होती जेव्हा आरोग्य विमा कंपनीने संबंधित हॉस्पिटलची करार केलेला असेल किंवा करार केलेला होता. जर संबंधित कंपनीने हॉस्पिटलची अशा पद्धतीचा टाय अप केलेला नसेल

तर हॉस्पिटलचे बिल अगोदर आपल्याला भरावे लागत होते व त्यानंतर क्लेम सेटलमेंट च्या माध्यमातून ते बिल आपल्याला निकाली काढावे लागत होते. परंतु आता या नियमांमध्ये बदल झाल्याने आरोग्य विमाधारकांना खूप मोठा फायदा आणि दिलासा मिळणार आहे.