बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाने जी काही दैदिप्यमान प्रगती केलीय ती वाखण्याजोगी नक्कीच आहे. पारंपरिक रूढी, परंपरा आणि जातीवाद बाजूला सारून या वैज्ञानिक युगाची वेसण प्रत्येकानेच हाताशी धरली आहे आणि त्याची गरज पण आहे. कारण, चालत्या काळा बरोबर चालण्यातच शहाणपण आहे. पण, त्याच बरोबर आपली पुरातन संस्कृती, विचारांचा ठेवा, पारंपरिक आदर्श आणि अमोघ ऐतिहासिक साहित्य (Literature) यांची जोपासना, संवर्धन आणि आत्मसात पण करणे गरजेचे आहे. कारण, ज्या वेळेस आधुनिक युगात तंद्रज्ञानाची (Technology) गाडी पंचर होती त्यावेळेस आपली वेग कमी होता काम नये.
ट्रेंड्स आणि अडथळे
उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला नवनवीन ट्रेंड्स (Trends) चालू होतात आणि संपतात. हे चक्र चालूच राहते पण, काही ट्रेंड्स त्यांची झलक माघे ठेऊन जातात, तर काही आपल्या जीवनाचाच भाग होऊन जातात. या ट्रेंड्समुळे आपले मनोरंजन होते, कामे सोप्पी होतात, नवनवीन मार्ग दिसू लागतात. पण, यामुळे जे व्हायला नको तेच होते, आपण यांच्या आहारी जातो आणि फक्त त्यावरच अवलंबून राहतो. आळशी बनत जातो, नाविन्य नाहीशे होते आणि आपले असे स्वतःचे काही राहत नाही. चला तर मंग पाहुयात कोणते मराठी ट्रेंड्स ठरतायेत मराठी माणसांसाठी अडथळे.
1 AI (Artificial Intelligence) कृत्रिम बुद्धीमत्ता
आजचा नवीन ट्रेंड्स म्हणजे जस्ट ‘Prompt it’, होय शाळेतील होमवर्क करायचाय, ऑफिस मधील एखांदे
काम करायचे आहे, कोणतीपण महिती हवीये किंवा कोणती कलाकृती तयार करायची आहे. त्यासाठी आता ज्यास्त कष्ट करायची आवश्यकता नाही. ‘chatgpt’ सारख्या AI हे काम फक्त काही मिनिटात करतात ते पण फक्त एका निर्देशावर.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) उदाहरणे
आभासी सहाय्यक
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कडून आपला डिजिटल अनुभव आणि कौशल्य आपण त्यांना कसे प्रदान करतो यावरून अनुकूल आणि वैयक्तिकृत सहाय्य मिळते. आभासी सहाय्यक ‘AI’ हा ‘Siri आणि Google Assistant’ सारख्या आभासी सहाय्यकांचा कणा आहे.
सुरक्षेसाठी चेहऱ्याची ओळख
ऍपलच्या फेस आयडी प्रमाणे प्रगत चेहऱ्याची ओळख तंत्रज्ञान, सुरक्षा उपायांना चालना देण्यासाठी AI चा वापर करते. हे तंत्रज्ञान वापरकर्त्यांना त्यांच्या अद्वितीय चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित ओळखून आणि प्रमाणीकरण करून संरक्षणाचा अतिरिक्त स्तर जोडते.
वैयक्तिकृत सामग्रीची शिफारस
AI चालित शिफारस प्रणाली ‘Netflix आणि युट्युब’ सारख्या प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या सामग्री सूचनांसाठी जबाबदार आहेत. युजर्सहे प्राधान्ये आणि वर्तनाचे विश्लेषण करून, या प्रणाली एखादया युजर्ससाठी फिल्म्सचे आणि शोज शिफारसी ऑफर करून मनोरंजन अनुभव वाढवतात. या नवकल्पनांमागे AI ही एक प्रेरक शक्ती आहे, जे अधिक अंतर्ज्ञानी, सुरक्षित आणि वैयक्तिकृत तंत्रज्ञान अनुभवांमध्ये योगदान देते.
बौद्धिक विकास आणि कृत्रिम बुद्धीमत्ता
बौद्धिक विकास अत्यंत महत्त्वाचे गोष्ट आहे, ज्यात चांगल्या बौद्धिक स्थितीतील विकास झाला पाहिजे याला महत्व नसून तो कसा झाला पाहिजे याला महत्व आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता ज्या पद्धतींचा वाफर करून आपले काम करते त्याला ‘Algorithm‘ असे म्हणतात म्हणजे या मध्ये निश्चितता एक मर्यादित आणि पुरावृत्तीची असते. नावीन्यतेला वाव असला तरी खूप संशोदनाची आवश्यकता आहे. एकूणच मनुष्याच्या बौद्धिक विकासात सध्या तरी कृत्रिम बुद्धीमत्ता वाटा पाहिजे तास नाही. लहान मुलांसाठी किंवा विद्यार्थी वर्गासाठी याचा ठराविक मर्यादेपर्यंत उपयोग होईल. फक्त सध्या ट्रेंड्स आहे म्हणून या गोष्टीचा सर्रासपणे वाफर होताना दिसत आहे. पण, त्याचा अतिरेक टाळावा. अश्या गोष्टीच्या आहारी जाण्याने अनेक नुकसान होतोत. थोडक्यात पाहुयात…
AI च्या अतिवाफरामुळे आळशीपणा वाढतो.
कृत्रिम बुद्धिमतेच्या आहारी जाण्यामुळे ज्या गोष्टी सहज करण्यायोग्य असतात त्या गोष्टी पण आपण AI च्या मदतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वाफर कसा आणि कुठे झाला पाहिजे याचे मार्गदर्शक तत्वे असले पाहिजे ज्यामुळे कामात उत्साह निर्माण होईल. आळशीपणा वाढल्यास कामातील उत्साह निघून जातो आणि काम रटाळ होते, त्यातील नाविन्य निघून जाते. थोडक्यात फक्त सध्या ट्रेंड्स आहे म्हणून या ठिकाणी फक्त ‘पाट्या टाकण्याचे’ कामे केली जातात.
AI मुळे पुनरावृत्ती वाढते.
कृत्रिम बुद्धिमतेच्या वाफरा मुळे कामात सातत्य येत असले तरी त्यामध्ये पुनरावृत्तीचा लवलेश राहतो. पुनरावृत्तीमुळे कामे रटाळ वाटतात. यामध्ये नाविन्य कमी झाल्यामुळे उत्साह येत नाही. थोडक्यात ट्रेंड्स आहे म्हणून आपल्याकडून रटाळ कामे करून घेतली जातात. आता ती कोण करून घेतायेत हा एक मोठा प्रश्न आहे? आम्हाला खाली कॉमेंट करा.
साध्या डोळ्याने दिसणारी कृत्रिमता (Artificialness)
नावातच कृत्रिमता असल्यामुळे दैनंदिन जीवनात याचा वाफर करताना कृत्रिमता दिसून येते. कृत्रिमता या दृष्टिटीने म्हटली जाते कि ज्या प्रकारे पारंपरिक, निश्चित आणि करत आलेल्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये जेव्हडा विश्वास असतो, आत्मीयता असते ती यामध्ये दिसून येत नाही. फक्त सध्या ट्रेंड्स आहे, लोक वाफर करतात, प्रशासन वाफण्यास सांगतात यामुळे यांचा आपण वाफर करत आहोत. यामध्ये असणारी कृत्रिमता नक्कीच कमी करता येईल लवलेश हा कायम स्वरूपी त्यामध्ये राहील कारण याचा दुरुपयोग करणाऱ्यांची संख्या पण काय कमी नाही!
Leave a Comment