कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) उदाहरणे

  1. प्राकृतिक भाषांतर प्रणाली (NLP) सिस्टम:
    • NLP सिस्टम, उदाहरणार्थ चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल असिस्टंट्स (Chatbot & Virtual Assistant), मानव भाषेची समजून प्रतिसाद देणारं कृत्रिम बुद्धिमत्ता दर्शवतं. उदाहरणार्थ Siri, Google Assistant, Alexa etc. भाषांतर सेवांसारखे व्यार्च्युअल असिस्टंट्स आहेत.
  2. प्रतिमा आणि चेहरा ओळख प्रणाली:
    • कृत्रिम बुद्धिमत्ता चित्र आणि चेहरा ओळखून त्यावर टिपा-टिप्पणी करते आणि त्यामध्ये सूचनांप्रमाणे आवश्यक ती बदलपण करू शकते. याचा वाफर सुरक्षा, सोशल मीडिया टॅगिंग, आणि Face ID सारखे फिचर स्मार्टफोनमध्ये फोन लोक आणि अनलॉक करण्यासाठी वापरले जाते.
  3. शिफारस सुचवणारी प्रणाली:
    • ऑनलाइन प्लेटफॉर्म्स AI द्वारे संचयित केलेल्या डेटाच्या आधारे उत्पाद, चित्रपटे किंवा कंटेंट सुचवतात. ‘Netflix, Amazon आणि Spotify’ सारख्या कंपन्यांनी ज्या सेवा पुरवल्या आहेत त्यावर पुनरावलोकन करून वाफारकर्त्याची आवड निवड लक्षात घेऊन एक अल्गोरिदम्स सेट केला जातो आणि चांगल्या आणि आवश्यक सेवांची आदण-प्रदान होते.
  4. स्वयंचालित वाहन:
    • स्वयंचालित कारची विकास, AI चा एक उत्तम उदाहरण आहे. हे वाहन नेव्हिगेट करण्यात आपत्कालीन निर्णय घेण्यास सक्षम आहे. भविष्यात व्यापार, उद्योग आणि वाहतूक यांसाठी याचे मोठे येगदान सिद्ध होईल.
  5. आरोग्य आणि निदानात्मक AI:
    • AI आरोग्यात महत्त्वाच्या भूमिकेत आहे, विशेषत: वैद्यकीय उपचारासाठी AI ‘X-ray आणि MRI’ चे विश्लेषण करून अचूक आणि अल्पावधीत माहिती पुरवतात. रोगचे निदान आणि उपचार करण्यासाठी वापरले जाणारे IBM चे ‘Watson for Oncology’ हे एक उत्तम उदाहरण आहे.
  6. गेमिंग इंडस्ट्री:
    • AI गेमिंग अनुभवात नॉन-प्लेअर कैरेक्टरचे वर्तन, समायोजित कठीण व त्याचे स्तर तसेच प्लेअरच्या वर्तणानुसार गेमिंगमध्ये रोमांचक अनुभव येतो. उदाहरणार्थ, ‘Chess or Go’ ज्यामध्ये AI सिस्टमने विरुद्ध बाजूला असेलेल्या ट्रेन आणि कुशल मानव खेळाडूला हरवेल आहे.
  7. वित्तीय व्यवहारातील धोके शोधणे:
    • फसवणूक शोधण्यासाठी आणि रोखण्यासाठी वित्तीय संस्था (बँक) AI चा वाफर करतात. मशीन लर्निंग अल्गोरिदम व्यवहाराच्या पद्धतींचे विश्लेषण करते आणि संभाव्य धोका ओळखून त्यावर प्रतिक्रिया देत अधिक सुरक्षित आर्थिक व्यवहार होण्यासाठी एक प्रकारे मदतच करते.
  8. रोबॉटिक प्रक्रिया ऑटोमेशन (RPA):
    • व्यवसाय प्रक्रियांमध्ये पुनरावृत्ती होणारी कार्ये स्वयंचलित करण्यासाठी सॉफ्टवेअर रोबोट्सचा वापर करणे योग्यच आहे. हे रोबोट डेटा एंट्री, इनव्हॉइस प्रोसेसिंग आणि इतर नियमित कामे करू ‘कुशलतेने’ (हा शब्द येथे वाफरावा लागत आहे) करू शकतात, कार्यक्षमता सुधारू शकतात! (तसा एक प्रश्नच आहे) आणि मानवी कामाचा भार कमी करू शकतात (काही प्रमाणात आणि काही वेळासाठी).
  9. भाषांतर सेवा:
    • AI संचालित भाषा अनुवाद सेवा, उदाहरण ‘Google Translate’ एका भाषेतून दुसर्‍या भाषेत मजकूर समजून घेण्यासाठी आणि भाषांतरित करण्यासाठी होतो. वेगवेगळ्या भाषेचे लोक एकमेकांशी संवाद करण्यासाठी या सेवा सहाय्य करतात.
  10. स्मार्ट होम डिव्हाइसेस:
    • AI चालित स्मार्ट होम उपकरणे, उदाहरणार्थ ‘स्मार्ट थर्मोस्टॅट, दिवे आणि सुरक्षा प्रणाली’, वापरकर्त्याची प्राधान्ये जाणून घेतात आणि त्यांच्या दिनचर्येशी जुळवून घेतात. ‘Nest’ सारखी उपकरणे घरगुती वर्तनावर आधारित ऊर्जेचा वापर ऑप्टिमाइझ करण्यासाठी AI अल्गोरिदम वापरतात.

या उदाहरणांमाध्ये, कृत्रिम बुद्धिमत्तेची विविधता आणि प्रतिभा आपल्याला विविध क्षेत्रांमध्ये रोजच्या आयुष्याच्या विविध पहायला मिळते.