RBI (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ने मंगळवारी 12 डिसेंबर, 2023 रोजी काही क्षेत्रांसाठी UPI प्रणालीवर स्वयंचलित पेमेंटची मर्यादा 15 हजार रुपये वरून थेट 1 लाख रुपये वाढवली आहे.
MF (म्युच्युअल फंड) चाही यामध्ये समावेश केला आहे. आत्तापर्यंत 15 हजारा पेक्षा जास्त आवर्ती व्यवहारांसाठी कार्ड आणि UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) वर स्थायी सूचना अंमलात आणताना AFA (अॅडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन) मध्ये सूट दिली जाते.
RBI काय म्हणते?
RBI (Reserve Bank of India) आवर्ती व्यवहारांसाठी ई-सूचनांच्या अंमलबजावणी वर जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे कि म्युच्युअल फंड सबस्क्रिप्शन, इन्शुरन्स प्रीमियम आणि क्रेडिट कार्ड बिल पेमेंटसाठी एका व्यवहारासाठी कमाल मर्यादा 15 हजार रुपया वरून 1 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. शक्तिकांत दास जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत, त्यांनी काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात UPI द्वारे स्वयंचलित व्यवहारांची मर्यादा 15 हजार रुपया वरून 1 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. तीच आता आमलात आली असल्याचे दिसत आहे.
UPI आकडेवारी काय सांगते?
नोव्हेंबर महिन्यातल्या समोर आलेल्या आकडेवारी वरून असे समजते कि 11.23 अब्ज पेक्षा अधिक व्यवहारांसह UPI हा मोठ्या वर्गासाठी डिजिटल पेमेंटचा पसंतीचा मार्ग असल्याचे दिसते. यामध्ये प्रयेक दिवशी वाढ होत असल्याचे दिसत आहे.
सायबर सेक्युरिटी (Cyber Security) समोर आव्हान
कमाल मर्यादा वाढवल्या बरोबरच जबाबदारीमध्ये सुद्धा कमालीची वाढ होते. आधीच ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांचा सुळसुळाट पाहण्यास मिळत आहे. त्यात मर्यादा वाढली म्हणजे नुकसान पण ज्यास्त होणार. त्यामुळे योग्य पर्यायांचाच वाफर हा डिजिटल पेमेंट साठी करावा.
Leave a Comment